लेखकाबद्दल

नमस्कार. मी श्रीधर इनामदार. मी गणितामध्ये डॉक्टरेट मिळाल्यानंतर आत्ता गणितामध्ये संशोधन करत आहे. सन १९९६ पासूनच माझ्या मनात भारतीय अद्वैत प्रणालीचा आधुनिक जगाला किती उपयोग आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली. साधारण तेव्हापासूनच मी सद्‍गुरु दादासाहेब सांगवडेकरांच्या सूचनेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. सन १९९८ला मला सद्‍गुरु दादासाहेब सांगवडेकरांचा अनुग्रह मिळाला व माझी साधना सुरु झाली. ज्ञानेश्वरीमुळे मला जे काही विचार स्फुरलेले आहेत ते एका ठिकाणी लिहून ठेवा म्हणजे ते हवेत विरून जाणार नाहीत अशी सूचना मला ती. संगीता आक्कांकडून मिळाल्यावर मी प्रथम इंग्रजीमध्ये Echoes In Mind हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली. आता सद्‍गुरुकृपेने मराठीतही लिहीत आहे.

 

आपले माझ्या लिखाणावरचे विचार आपण मला जरूर कळवा. माझी अशी खात्री आहे की मला हे सर्व विचार सद्‍गुरुकृपेनेच सुचलेले आहेत. परंतु माझ्या स्वतःच्या असमर्थपणामुळे ही कृपा मला कितपत कळली आहे ह्याबद्दल मी साशंक आहे. आपल्या सर्वांच्या सूचना मला ज्ञानेश्वरी समजायला उपयुक्त ठरतील म्हणून आपण संकोच न करीता आपल्या सर्व सूचना कळवाव्यात अशी माझी नम्र विनंती आहे. जर ब्लॉगवर comments लिहावसं वाटलं नाही तर आपण मला माझ्या inamdar.s@gmail.com पत्त्यावर e-mail लिहू शकता. मी वाट पाहत आहे!!

43 thoughts on “लेखकाबद्दल”

  1. Apratim likhan aahe aaple..
    Nitant Sundar….Dusre shabd ch nahit…Kewal sadguru krupe ne ch aaply hatun etke sundar lihile gele aahe yat shanka nahi..
    Mi aapla ek lekh aamchya Yahoo group war copy paste kelay ( amcha group Sadguru Gondavalekar maharajan chya sadhakan ni chalu kelay)
    Jar kahi copy write cha bhang zala asel, tar Rama jawal ch mafi magto mi…
    I am sure you would not mind in speading these beautiful writing amongst the netisn Sadhakas….over the globe..

    Janaki Jeevan Smaran Jay Jay Ram
    Dhiraj deo
    Baden, switzerlands.
    —————–

    1. सुंदर आणि अप्रतिम, पण सर्व श्लोकांवर लेखन असेल तर पूर्ण द्न्यानेश्वरी समजणे सोपे होईल व माझ्यासारख्या अनेकांना मदत होईल असे वाटते

  2. खरं तर तुमच्या लिखाणाचं योग्य कौतुक होइल असे शब्द माझ्याकडे नाहीयेत. एवढं मात्र नक्की की ते वाचतांना बाहेरच्या जगाचा विसर पडायला होतो अन एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते तेवढ्या वेळात.
    You are a blessed person who is spreading his blessings through this blog.
    Keep up the divine work… 🙂

  3. अतिशय वाचनिय असा ब्लॉग आहे. मी संपूर्ण वाचायाचा प्रयत्न करेन.
    इतकी अध्यात्मिक माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  4. The way of writing indicates your “Sahaj” approach to maulee’s teaching.I am happy that you are able to express in simple but sure words and make reader to uderstand exactly what you want to convey.
    This is possible because Mauli is making you to write and you are nly “Lekhaku”

    luckilyI could get your articles.
    Thanks and loving regards,

    Madhukar Sonavane
    21/10/2011.

  5. As a student of ” DNYANESHWARI” , I always look for the related topics. Needless to say, your experiences are out of the way.I’il definitely like to communicate with you, of-course if possible. So please forward me your details regarding communication.

    My Details are as…………..
    DR. A. P. DHANDE
    KANDARI AREA
    BHUSAWAL CITY,
    JALGAON DISTRICT,
    Mo :– 9923443039

    1. प्रिय श्रीधर,आपणास लघु ज्ञानेश्वरी पाठवीत आहे. ज्ञानेश्वरी वाचायची आहे पण वेळ मिळत नाही त्यांचे साठी हि उपयुक्त आहे.
      माउली आपणास नित्य मार्गदर्शन करीत राहो.
      माउलीच्या समाधी दिवशी आदल्या दिवशीच्या रात्री पासून समाधी वेळे पर्यंत म्हणजे दुपारी ३/१५ पर्यंत मी मौन पाळतो त्यावेळी काही खाणा खुणाही करायच्या नाहीत.आपल्याशी संबधित अशा गोष्टीत हो नाही असे मानेने सुचवितो.जगात जे चालले आहे त्यात लुड बुड करणे थांबवितो.तो काल माउलीच्या वाचनात घालवितो. गेले बारा वर्षे चांगले जमले.माऊलीच्या अस्तीत्वाची जाण होते.आपण अनुभव घेऊ शकता.
      शुभेच्छा
      अण्णा

      Thanks wih Regards,

      M. V. Sonavane

      Cell No. : 94227 56333

      Date: Wed, 28 Nov 2012 04:47:28 +0000
      To: msonavane@hotmail.com

  6. आपण भाग्यवान आहात.माउलीने आपल्या जीवनाला मार्ग दाखविणारा सद्गुरूचा लाभ दिला.मला गवसलेले सत्य जे ज्ञानेश्वर माउली आणि श्री गोंदवलेकर महाराज यांचेकडून लाभले ते हे कि आपण कुणालाही दुखवू नये. अगदी मनानेहीआणि वर्तमान हे ईश्वराचे मनोगत आहे.त्याला न्याय द्यावा.मी कर्ता नाही हे सदैव मनी बाळगावे.आपल्याला जे वैशिष्ठ भगवंताने दिले ते उन्नत करून समाजासाठी उपयोगी पाडावे.
    श्रावणाच्या शुभेच्छा
    -अण्णा सोनवणे.नाशिक

  7. नमस्कार,
    सर्वप्रथम तुम्हाला ध्यावे ऎवढे धन्यवाद कमीच आहेत…ज्ञानेश्वरीचे खुप सर्मपक विवेचन आपण केलेत….प्रत्येकाला ज्ञानेश्वरी वेगवेगळी अनूभुती देत असते.

    फारच छान आणि वाचनीय….हा उपक्रम असाच चालू ठेवा हि विनंती.
    धन्यवाद
    प्रमोद धुमाळ

    1. प्रथमत अतिशय आभार…
      आपल्या लेखणीने मनातील बऱ्याच प्रश्नांचे गूढ़ उकलले.आजपर्यंत विविध धर्मग्रंथ नेमके अवगत कसे करायचे ? हीच समस्या आपण सोडविली. आपले लेखन वाचल्या नंतर खुप मोठं यशाची अनुभूती प्राप्त झाली.
      अनंत धन्यवाद ।

  8. नमस्कार सर
    मी संदीप देवकर
    आपल्या ब्लिग चा 6 वर्षांपासून वाचक आहे , मला तुमचा whats app नंबर हवा आहे मी केवळ धार्मिक माइगदर्शन व चर्चा करण्यासाठी आपल्या संपर्कात राहू इच्छितो. विना कारण आपला वेळ घेणार नाही हे मी नमुद करतो

    आपला वाचक
    संदीप देवकर

  9. आपण छान लिहिलंय.माऊलीच्या लिखाणाचं गारूडच असे आहे की, त्याबद्दल जे वाचावे ते अंतःकरणाचा ठाव घेणारे असते.हि तो माऊलीची कृपा . ज्ञानदेवांच्या विराण्यातली गुढता आकळणे हे येरागबाळ्याचे काम नाही.त्यादृष्टीने आपला प्रयत्न स्तुत्य आहे.काही शंका आहेत ,पण हे तुमचे interpretation असु शकते..

    1. धन्यवाद प्रवीण शेळके.
      हो. हे सर्व मला सुचेलेल्या अर्थाचेच लिखाण आहे. प्रत्यक्ष माउलींना काय सांगायचे आहे हे कुणाला कळणार?!

  10. अवर्णनीय असं ईश्वरी कार्य, माऊली अन् रुकडीकर महाराजांचे इच्छा कृपा आशीर्वादाने तुमच्या द्वारे होत आहे. आमच्या सारख्या पामरांना लेख वाचताना काही क्षण तरी देहभान विसरून आनंद, बोध देण्याचं पुण्य काम तुम्ही करताय. 🙏🙏

यावर आपले मत नोंदवा